पोलीस आपल्या दारी " उपक्रमा अंतर्गत ठाणेदारांनी गावात जाऊन साधला गावकऱ्यांशी संवाद...


अकोला जिल्हा प्रतिनिधी:-संजय चव्हाण.

मूर्तिजापूर तालुक्यातील परंतु पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कवळा येथे " पोलीस आपल्या दारी " कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर उपक्रम अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या संकल्पनेतुन /आदेशानुसार पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय कुमार वाढवे यांच्या अध्यक्षतेखालीसर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी व त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्या जागेवरच दूर करण्यासाठी "पोलीस आपल्या दारी " या उपक्रमा अंतर्गत एक गाव एक पोलीस या योजनेच्या माध्यमातून कवळा येथील नागरिकांशी ठाणेदार वाढवे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले. सर्वसामान्य नागरिक अनेकदा पोलिस ठाण्यात यायला घाबरतात. एखादी समस्या छोटी असतानाच तिचा निपटारा केला नाही तर ती पुढे जाऊन मोठ्या समस्येत रूपांतरीत होते. त्यामुळे पोलीस आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत पोलिस अधिकाऱ्यांनी गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करणे या उपक्रमात अपेक्षित आहे. गावकरी लोकांचे म्हणणे एकून घ्यायचे, त्यावर तोडगा काढायचा अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या समस्या स्थानिक स्तरावर असतात.याबाबत ठाणेदार वाढवे व बिट जमादार राजू वानखडे यांनी उपस्थित गावकरी यांना सविस्तर मार्गदर्शन केले व काही नागरिकांच्या मनामध्ये पोलीस यांच्या विषयी असलेले भीतीचे वातावरण दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने पत्रकार सागर पंडित यांच्या हस्ते ठाणेदार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला बिट जमादार राजू वानखडे , पो.हे.कॉ.अशोक देशमुख,पो.कॉ.अभिजित सिरसाट ,गोपनीय शाखेचे गोपाल अकोटकर,ऋषिकेश गावंडे ,जयेंद्र पंडित, विशाल पंडित ,बाळासाहेब देशमुख ,अंबादास सुनील देशमुख नंदकुमार गावंडे ,सुखदेव पंडित ,प्रदीप पंडित, निलेश देशमुख प्रवीण गावंडे, प्रशांत पंडित, अविनाश पंडीत, रामराव अंभोरे ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post Next Post