जिल्हा परिषद अकोला चे माजी शिक्षण सभापती श्री चंद्रशेखर पांडे गुरुजी व श्री लखन गावंडे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश..


 अकोला जिल्हा प्रतिनिधी:-डॉ  संजय चव्हाण.

शनिवार दिनांक 22 जानेवारी रोजी भारतीय जनता पक्ष कार्यालय अकोला येथे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री गोवर्धनजी शर्मा, आमदार श्री प्रकाशभाऊ भारसाकळे, आमदार श्री हरीषभाऊ पिंपळे, श्री तेजराव थोरात, श्री विजय अग्रवाल, यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद अकोला चे माजी शिक्षण सभापती श्री चंद्रशेखर पांडे गुरुजी व श्री लखन गावंडे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्षप्रवेश घेतला श्री चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना अकोला भाजपा जिल्हाउपाध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली तसेच श्री लखन गावंडे यांना  युवामोर्चा अकोला जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती देण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बार्शीटाकळी राजू पाटील काकड, भाजपा तालुकाध्यक्ष मूर्तीजपुर भूषण कोकाटे, रवी पाटील राऊत, सुनील ठाकरे, योगेश कोंदनकर, अशोक राठोड, विलास गोरले, विठ्ठल वाघ, डॉ.रवी कोकाटे, गोवर्धन सोनटक्के, लखन अरोरा तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post