चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेले टेम्बुंसोडा इंडियन बँक या बँके मध्ये दिनांक 19/1/2022 रोजी त्रस्त झालेले शेतकरी बँकेचे अकाउंट बंद असल्या मुळे चिचखेडा येथील अल्पभूधारक शेतकरी श्री बब्बू अजनेरिया हे पंतप्रधान, किसान योजनेचे खाते व्होल्ड बंद केल्याचे समजल्यावर बँकेत आले होते बब्बू अजनेरिया यांनी बँक मॅनेजर श्री बघेल यांना विचारणा केली असता त्या दोघां मध्ये वादी वाद झाल्याचे समजले खातेदार बब्बू अजनेरिया बँकेच्या बाजूला असलेल्या एका टेशनरी दुकाना समोर बँक मॅनेजरला मारहाण करण्याचा आरोप तक्रारीत म्हटले आहे इंडियन बँकेचे मॅनेजर, बिनीष चंद्र बघेल, यांनी पोलीस स्टेशन चिखलदरा येथे येवून लेखी रिपोर्ट दिली. लेखी तक्रार मध्ये असे म्हटले आहे की शेतकरी बब्बू अजनेरिया यांनी मला बँकेत येवून महाराण करून जिवे मारण्याची धमकी दिली या तक्रारी वरून पोलीस स्टेशन चिखलदरा यांनी कलम 332 /353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच घटनेच्या दिवशी पोलीस पाटील यांचे पुतण्या श्री अजनेरिया यांनी चिखलदरा पोलीस स्टेशन मध्ये येऊन लेखी स्वरुपात निवेदन दिले आहे की माझे काका यांना बँक मॅनेजर व अधिक काही लोकांनी जातीवाचक शिवीगाळ केली व त्यांना अस्वस्थ वाटल्या मुळे, माझे काका, घरून कुठेतरी निघून गेले आहे माझ्या आरोप आहे की मावशी काका पोलीस पाटील बब्बू अजनेरिया वय 55 वर्षे राहणार चिचखेडा पोलीस स्टेशन चिखलदरा हे दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचा आरोप, अजनेरिया यांच्या पुतण्याने केला आहे. या बाबतची चौकशी असल्याचे मत ठाणेदार राहुल वाढवे यांनी सांगितले. घटनेचा पुढील तपास उपपोलीस निरीक्षक चिखलदरा रूपणर साहेब. यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पोलीस कर्मचारी करीत आहेत.
ईलाबाद बँक मॅनेजर मारहाण प्रकरण तापलं, पोलीस,पाटिल, यांच्या वर गुन्हा दाखल, मॅनेजर विरोधात,जाती वाचक शिवीगाळ,ची तक्रार...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी