जळगाव जामोद व्यापारी संघटनेने केला पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

लोकहीताचा वसा जोपासत , निष्काम सेवा देणाऱ्या पत्रकारांचा व्यापारी संघटना जळगाव जामोद तर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधत सन्मान करण्यात आला. 6 जानेवारी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती. हा दिवस  पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परंतु शासन दरबारी नेहमीच उपेक्षित असणाऱ्या पत्रकारांचा त्यांच्या सेवेसाठी सत्कार करण्याचे व्यापारी संघटनेने ठरविले होते. दिनांक सहा जानेवारी दोन हजार बावीस ला स्थानिक जलाराम मंदिरात कोविड  नियमांचे पालन करत हा सन्मान सोहळा पार पडला. ज्येष्ठ व्यापारी हसमुखजी सेदानी यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सन्मान सोहळ्यात अजय वानखेडे अध्यक्ष व्यापारी संघटना, एफ आर खान , गौतम भंसाली (उपाध्यक्ष) चतुर्भुज केला सचिव व्यापारी संघटना जळगाव जामोद ,ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू जी भगत, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन, सोबतच पत्रकारांचे शस्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  डायरी व लेखणीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . कोरोना  काळात जनजागृतीचे कार्य अविरतपणे पार पाडणाऱ्या पत्रकारांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. कोणताही मोबदला न घेता निस्वार्थपणे सेवा देणारे पत्रकार हे खऱ्या अर्थाने कोरोना युद्धे होत असे प्रतिपादन अजय वानखडे यांनी केले. कुंजबिहारी गांधी यांनी पत्रकारांना बद्दल आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली . याप्रसंगी अभिमन्यू भगत, नानासाहेब कांडेलकर , गुलजार खा पठाण ,शमीम बापू देशमुख, गुलाबराव इंगळे, अनिल पाटील, कैलास देशमुख, जय देव वानखडे, वासुदेव राजनकर, अर्षद इक्बाल, देविदास तायडे ,भीमराव पाटील, विजय पोहनकर राजू वाढे, गणेश भड, विनोद चिपडे ,  अमोल भगत,  अश्विन राजपूत, मनिष  ताडे, मंगेश राजनकर , मोहम्मद फारुख, राजू बाठे,  अनिल भगत, संतोष कुलथे, विठ्ठल गावंडे , जकरूल्ला खान, गजानन सोनटक्के  यांचा गुलाब पुष्प ,भेटवस्तू व कोरोना  योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सत्कार सत्कार प्रसंगी अभिमन्यू भगत, कैलास देशमुख, भिमराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एफ आर खान यांनी तर सूत्रसंचालन अनिल भगत , आभार प्रदर्शन जितेश पलन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता निलेश सेदानी, महेंद्र पलन ,हुसेन डायमंड ,अजय पलन, विनोद उनडकाट , मुरली जोशी, रमेश मोदी, डॉक्टर बानाईत, डॉक्टर जाधव ,दिलीप बुद्धदेव ,मनोज पलन यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post