हताश शेतकऱ्यांचे वीज वितरण कंपनी विरोधात निवेदन...


जळगाव (जामोद)प्रतिनिधी:-

दिनांक 6 जानेवारी ला ग्राम खेर्डा (बु) येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष उकर्डा मदनकार ह्यांनी आपल्या शेतात विहीर खोदून 9 डिसेंबर2010 ला वीज वितरण कंपनी कडे 5700रु कोटेशन भरणा करून दिला.मात्र गेल्या 12 वर्षात सदर शेतकऱ्याला हेलपाटे,चकरा मारायला लावणाऱ्या वीज वितरण कंपनी प्रशासनाने काहिच दिले नाही.साधारणतः वीज ग्राहकाने वीज बिल भरण्यास दिरंगाई केल्यास त्याच्या कडून व्याज व दंड घेणारी वीज वितरण कंपनी या शेतकऱ्याला मागील 12 वर्षा चे त्यांचे बागाईत न झाल्याने झालेले नुकसान त्याना झालेला मानसिक शारीरिक त्रास भरून देणार आहे का? हेच आता या निवेदनातून पुढे येईल.सदर निवेदनात शेतकरी सुभाष मदनकार ह्यांनी वीज वितरण कंपनी वर नुकसानभरपाई व वीज जोडणी ही 26 जानेवारी22 या प्रजासत्ताक दिनाच्या पर्यंत न केल्यास ते जिल्ह्यातील कोणत्याही गावी जेथे झेंडा वंदन झाले असेल त्या झेंड्याखाली आत्मदहन करणार आहेत असे निवेदनात त्यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव (जामोद) ह्यांना सांगितले.सदर बाब ही अत्यंत निष्काळजी पानाची असून आशिक्षीत शेतकरी वर्गाला हे नालायक प्रशासन कशी वागणूक देते व त्यांनी अवहेलना करते हेच या प्रकरणातून समोर येत आहे.सदर निवेदनाच्या मुळे वीज वितरण कंपनी चा भोंगळ कारभार-भ्रष्टचरी वृत्ती समोर आली आहे.

Previous Post Next Post