अवकाळी पावसाने मेळघाटातील रब्बी धोक्यात...


राजु भास्करे /गौलखेडा बाजार 

अवेळी अवकानी पाऊस होत असल्याने मेळघाटमध्ये थंडी वाढली असून संपूर्ण मेळघाट गारठला आहे.त्यामुळे त्याचा फटका येथील   शेतकरी,आणि गुरख्यांना बसत आहे.8' अंशापेक्षा  कमी तापमान असल्याने गारवा वाढला आहेत सायंकाळ होताच मेळघाट मधील गावामध्ये चौकाचॊकात  शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस व धुके व सतत चे ढगाळ वातावरण वाढल्याने  सर्वत्र शीतलहरी येत आहेत त्यामुळे तापमान अतिशय कमी झाल्याने थंडीने दणका द्यायला सुरवात केली आहे.आणि त्यातल्या त्यात ढगाळ वातावरण असल्याने सूर्याचे दर्शन दिसेनासे झाले आहे.सततचे धुके त्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी पिके धोक्यात आली आहेत.दिवसभर कांनटोपी आणि स्वेटर घालून आपले दैनंदिन कामे  करताना येथील नागरिक दिसत आहेत.थंडीमुळे गवळी समाजाचा मुख्य व्यवसाय दूध दुभते वर ही परिणाम झाला आहे.गुरांनि थंडीमुळे दूध कमी केले असल्यामुळे दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे.थंडीमुळे सर्दी खोकला, आणि दम्याचा आजार वाढत आहे आणि त्यात पुन्हा कोरोनाची दहशत पसरत असल्याने भीती निर्माण झाली आहे.

------------------------

ढगाळ वातावरण व धुक्यामुळे रब्बी हंगामातील चणा पीकावर मोठ्या प्रमाणात अळ्या पडत आहेत याचा परिणाम उत्पनावर होणार

संतोष शेळके

शेतकरी टाकरखेडा धारणी

Previous Post Next Post