सुसर्दा वनपरीक्षेत्रातर्गत बिबामल येथे 27 डिसेम्बर रोजी जि. प.शाळेच्या आवारात दोन दुर्मिळ गिधाड पडले होते, ते पाहण्यासाठी गावकऱ्यानी प्रचंड गर्दी केली होती. त्यापैकी एक गिधाड उडून गेला तर दुसरा जख्मी अवस्थेत पडलेला होता.त्या जख्मी गिधाडाला वनमजूर रामप्रसाद पटोरकर यांनी ताब्यात घेतले व वनकार्यालयात आणले.व पिंजऱ्यात ठेवले.तो हिमालयाचा दुर्मिळ ग्रीफान उल्चर असल्याचे स्पष्ट झाले.याबाबत वनपरीक्षेत्रधिकारी सुसर्दा यांनी वरिष्ठ कार्यालयात माहिती दिली.त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून त्यावर सतत तीन दिवस पशु वैधकीय तज्ञांकडून उपचार करून गिधाडाच्या प्राकृतिमध्ये सुधार झाल्याचे संकेत मिळाल्यावर त्याची खात्री करून परतवाडा येथील ट्राझीस्ट ट्रीटमेंट सेंटर च्या डॉक्टरांच्या उपस्थितीत गिधाडाला पक्षांच्या नैसर्गिक अधिवासात वनखंड 1193 अजगरउपरी नामक भागातून सोडले.तेंव्हा सदर गिधाड अडीचशे मिटर पायी चालत चालत त्याने उंच आकाशात गगन भरारी घेतली. तेंव्हा सर्वांनी आनंदाचा श्वास सोडला.त्याप्रसंगी डॉक्टर वैभव हगवणे वनपरीक्षेत्राधिकारी श्रीमती डेहनकर वनपाल चौधरी व वनकर्मचारी उपस्थित होते.
------------------------
मेळघाटात आलेल्या ग्रीफन उल्चर या विदेशी गिधाडाचे मोठाले पंख पाहून धन्य झालो.
भारत मेटकर
बिबामल
--------------------
------------------------
सदर गिधाड जख्मी अवस्थेत सापडल्यावर तीन दिवस वर्तुळ कार्यालयात त्यावर पशुवैधकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले ट्रानसिस्ट ट्रीटमेंट सेंटर चे डॉ. हगवणे यांनी सुदृढ झाल्याची खात्री केल्यावर सोडून दिले.
शुभांगी डेहनकर
वनपरीक्षेत्राधिकारी सुसर्दा