यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी/संजय कारवटकर
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील बेलखेड या गावातील वर्ग पाच ची विद्यार्थिनी कु. शुभश्री शिवाजी काळे हीने उमरखेड तालुक्यातुन पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत द्वितीय क्रमांक ग्रामीण भागातून पटकावला आहे . बेलखेड या गावात 1 ते 7 वर्ग असुन या पाचवीतील मुलीने शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे,या यशाचे श्रेय मुलीने आई वडील व वर्ग शिक्षक प्रवीण मलमे, मुख्याध्यापक कांबळे सर,व इतर सर्व शिक्षकांना दिले आहे व बेलखेड गावात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे