हेटी ही मेळघाट मधील गवळी बांधवासाठी अतिशय महत्वाचं स्थळ होय. गवळी समाजातील प्रत्येक जण हेटीशी संबंधित आहे.गुरे आणि हेटी यांचं परस्पर संबंध आहे. हेटी कधी जंगलात असते तर कधी शेतात तर हिवाळ्यात व उन्हाळ्यात ती वऱ्हाडात जाते.मेळघाट मधून गुरांच्या चारासाठी व आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी मेळघाटचा गवळी समाज डिसेंबर च्या सुरवातीपासून आपली हेटी घेऊन वऱ्हाडाकडे पलायण करतो. सद्यस्थितीत मेळघाट मधून गवळी समाजाचे गुरांचे जत्थेचे जथे मेळघाट मधून वऱ्हाडाकडे स्तलांतरित होताना दिसत आहे.हेटी म्हणजे जीवनावश्यक कपडे, धान्य व नित्यपयोगी भांडे साहित्य एका बंडीत भरून ठेवलेलं बिऱ्हाड व सोबतीला गाई म्हशी.हिवाळा लागला की मेळघाट मधील गवळी बांधव आपल्या गु्रांसह हेटी घेऊन सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वऱ्हाड प्रांतात चारा मिळेल त्या ठिकाणी मुक्काम करून निघतो.गुरासाठी हिरवा चारा कडबा विकत घेतो. त्या मोबदल्यात कधी पैसे देतो तर कधी त्यांच्या शेतात गाईम्हशी बसवून शेण व गोमूत्र.ऊन असो वादळवारा, गारा असो की पाऊस सर्व ऋतूमध्ये हेटी कायम असते.अशी ही हेटी संघर्ष करत उभी असते.हेटी सोबत लहान मुले, आबाल वृद्ध सर्व असतात. हेटी वर स्वतःच्या कुटुंबाची व गुरांची पोटाची खडगी अवलंबून असते.मुले ही सोबत असतात त्यात त्यांचे शिक्षण अधुरे राहते. म्हणून मेळघाट मधील गवळी समाजात शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे.आमच्या गावाकडील चारा पाणी संपल्याने चाराच्या शोधात वऱ्हाडात हेटी घेऊन निघालो "
गोपालक
उदेभान पाटिल सावऱ्या