शेगाव विकास आराखडा मध्ये बाधित झालेल्या खळवाडी परिसरातील नागरिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज पासून नगर पालिकेसमोर विक्रम सौदे आणि दादाराव वानखडे या बाधित युवकांनी नगर पालिकेसमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात केली आहे.विकास आराखडा मध्ये बाधित झालेल्या खळवाडी भागातील नागरिकांचे पुनर्वर्सन करतांना शासनाने सर्वच कुटुंबियांवर अन्याय केलेला असून खळवाडी परिसरातील आता पर्यंत ३३३ सदनिका वाटप झालेल्या आहेत. मात्र आणखीन जे पात्र आहेत अश्या ५० जणांना अद्यापही मोबदला देण्यात आलेला नाही.या विषयाला घेऊन या भागातील बाधित असलेले विक्रम सौदे आणि दादाराव वानखडे या बाधित युवकांनी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात केली आहे.
मागील महिन्यात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. वडेट्टीवार हे शेगावात आले असता खळवाडी मधील बाधितांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन निवेदन देऊन झालेले अन्याय कथन केले होते यावेळी शेगाव विकास आराखड्यामध्ये बाधित झालेल्या खळवाडी परिसरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यात येईल वेळ प्रसंगी बैठक लावू, इथं कुणालाही खपवून घेतले जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र ते आश्वासन आश्वासनच राहिले आहे.