राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
खासदार नवनीत राणा यांचा निकटवर्तीय तसेच युवा स्वाभिमान पार्टीचा असलेला मेळघाट प्रमुख उपेन बछले याने आपल्या मुलीला आणि पत्नीला वाऱ्यावर सोडले आहे. याबाबत या पीडितेने नवनीत राणा यांच्या कडे मदत मागत न्याय देण्याची मागणी केली. मात्र, मदत करण्याऐवजी मला विचारुन तु त्याच्याशी लफडा केला का? असा उलट सवाल नवनीत राणा यांनी या महिलेला केला आहे. याची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. नवनीत राणा यांनी याप्रकरणी योग्य तो खुलासा लेखी स्वरूपात द्यावा, असे निर्देश महिला आयोगाने दिले आहे.