पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने एका तासात विहरीतील मृतदेह शोधुन बाहेर काढला.घोटा येथील विहिरीत पडून आत्महत्या...घोटा येथील क्रिष्णा दयाराम घोटकर वय अं.25 (वर्षे) हे 22 जानेवारी रोजी सायंकाळी अं.सहा वाजता पासुन घरुन निघुन गेले होते तेव्हा पासुन नातेवाईकांसह गावकरी त्यांचा शोधा घेत होते यावेळी मुर्तीजापुर रोडवरील घोटा गावालगतच्या नाल्या जवळील विहरीजवळ मोबाईल आणी चप्पल आढळून आली तेव्हा लगेच याची पिंजर ठाणेदार अजय कुमार वाढवे साहेब यांच्या आदेशानुसार पो.स्टेशनला माहीती देण्यात आली.आणी लगेच आज सकाळी पिंजर पो.स्टे.चे पो.उप-नि.बंडु मेश्राम साहेबांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले.लगेच दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयुर सळेदार, अंकुश सदाफळे,आशिष मुळे यांना शोध व बचाव साहीत्यासह घटनास्थळी पाठविले.आणी पिंजर पो.स्टे.चे ठाणेदार अजयकुमार वाढवे साहेब यांच्या आदेशाने पो.उप.नि.बंडु मेश्राम साहेब यांच्या मार्गदर्शनात पथकाचे सदस्य अंकुश सदाफळे,मयुर सळेदार, आशिष मुळे,यांनी सर्च ऑपरेशन चालु केले असता एका तासात पथकाच्या जवानांनी पाण्यातील मृतदेह शोधुन बाहेर काढला,यावेळी या सर्च ऑपरेशन मध्ये पो.उप-नि.बंडु मेश्राम साहेब,बि.ज.राजुभाऊ वानखडे,पो.काॅ.अभिजित शिरसाट,पो.काॅ.सतीश कते, हे सहभागी होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.पुढील तपासणी पिंजर ठाणेदार अजय कुमार वाढवे साहेब psi बंडू मेश्राम साहेब बीट इन्चार्ज राजू भाऊ वानखेडे अभिजीत शिरसाट सतीश कथे पाटील हे करीत आहे.
विहरी जवळील चप्पल व मोबाईल या संशयावरुन विहरीत शोधला मृतदेह...
अकोला जिल्हा प्रतिनिधी:-संजय चव्हाण.