राजमाता जिजाऊ जयंतीदिनी एल्गार संघटना व आदित्य मोटर च्या वतीने करण्यात आला पत्रकारांचा सन्मान...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

24 तास निष्काम सेवा देणाऱ्या तसेच सदैव लोक हिताकरिता लढणाऱ्या व अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पत्रकार बांधवांचा एल्गार संघटना व आदित्य मोटर्स यांच्या संयुक्त वतीने दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीदिनी करण्यात आला सन्मान. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असलेल्या परंतु सतत शासन दरबारी उपेक्षित असणाऱ्या पत्रकारांचा त्यांच्या सेवेसाठी सत्कार करण्याची एल्गार संघटनेने ठरविले. त्यातच 6 जानेवारी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व समोरच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती यांची संयुक्त जयंती साजरी करीत हा कार्यक्रम या ठिकाणी एल्गार संस्थापक अध्यक्ष प्रसेंजित पाटील यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास बापु देशमुख, ज्येष्ठ पत्रकार गुलजार खा पठाण, ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील, विजय ठाकरे विराजमान होते. यावेळी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहाराने पूजन करण्यात आले यावेळी पत्रकारांचे शास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेखणी व डायरी मान्यवरांच्या हस्ते संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील पत्रकारांना भेट स्वरूपात देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब कांडलकर, अभिमन्यू भगत, शमीम देशमुख, गुलजार खा पठाण, अनिल पाटील, कैलास बापु देशमुख, जयदेव वानखडे, भीमराव पाटील, देविदास तायडे, विजय पोहनकार, राजू वाढे, राजेश बाठे, विठ्ठल निंबाळकर, अनिल भगत, गणेश भड, विनोद वानखडे, दयालसिंग, अमोल भगत, अश्विन राजपूत, मनीष ताडे, मोहम्मद फारुख, संतोष कुलथे, पत्रकार सन्मान सोहळ्यामध्ये कैलास बापु देशमुख, अनिल पाटील, राजु वाडे, अश्विन राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट मोसिन खान यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय पोहणकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आशिष वायझोडे, निजाम राज, मोईन राज, चंदू पाटील, प्रल्हाद वायझोडे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post