गरीब व गरजू आदिवासी बांधव हा आर्थिकरित्या संपन्न व्हावा, त्यांच्या मुलांचे शिक्षण चांगल्या रीतीने व्हावे. आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्याचा शासनाचा सकारात्मक प्रयत्न किरसान (लखपती) मोहा बँक या संकल्पनेमागे आहे. मेळघाटातील पर्यायाने कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू याचा समूळ नायनाट व्हावा अशा यामागचा उद्देश आहे._ सहाय्य्क जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्या अभिनव संकल्पनेतून मेलघाटातील प्रत्येक गावात किरसान (लखपती) मोहा बँक कार्यान्वित करण्याचे ठरले होते. याकरिता ११ व त्याहून अधिक लोकांचा गट कार्यान्वित करणे गरजेचे होते. मोह संकलित करून आर्थिक उत्पन्न वाढवणे तसेच विविध शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणार्या योजनामधून गरीब व गरजू लोकांना लखपती बनविण्याच उद्देश यामागे होता. त्या अनुषंगाने खापरखेडा या आदिवासी बहुल गावात सुद्धा सबब बँक स्थापन करण्यात आली. मात्र सबब मोहा बँक समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, कृषी मित्र अशा प्रकारच्या गाव पातळीवरील सधन, श्रीमंत व प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे. त्यांना गावातील गरीब व गरजू लोकांशी काहीही घेणेदेणे नाही. त्यांना फक्त स्वत: कसे श्रीमत होता येईल येवढेच माहीत आहे व त्यादृष्टीनेच ते राजकारण करून व त्यांच्याकडे असलेल्या पैशाच्या भरोश्यावर सदर समितीचा दुरूपयोग करीत असल्याचे गावातील लोकांची तक्रार आहे. *महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत या गावामध्ये विविध प्रकारची कामे प्राधान्याने शुरू करण्यात आली आहे. समितीतील लोकांना कामावर जाणे व काम करणे अनिवार्य आहे पण समितीमध्ये असणारे हे प्रतिष्ठित लोक कामावर जात नाही व रोजगार सेवकावर दबाव टाकून हजेरी लावून काम न करता पैसे काढतात. या बाबीमुळे *गावातील गरीब कसा सक्षम होईल व गावातील बेरोजगाराची समस्या कशी सुटेल* असा प्रश्नचिन्ह गावातील नागरिकांसमोर आहे._
खापरखेडा या गावामध्ये आदिवासींचा समृद्धीचा मार्ग ठरू शकणारी किरसान (लखपती) मोहा बँक फक्त सधन व श्रीमत लोकांसाठीच...
सुंदरलाल पोटेकर /धारणी तालुका प्रतिनिधी