हिवरखेड पोलिसांची अवैध गौमासवर कारवाई,बेलखेड येथील कुरेशीच्या निवासस्थानी टाकली धाड.आरोपी विकत होता मास,


प्रतिनिधी:-प्रशांत भोपळे.

हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलखेड येथे २३ च्या पहाटे येथील टिपू सुल्तान चौकातील रहिवाशी कुरेशी  याच्या निवासस्थानी जाऊन  पोलिसांनी धाड टाकली, सदरची कारवाई   आकोट येथिल उपविभागीय अधिकारी रितू खोकर, याच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलिसांनी केली आहे, या कारवाई मध्ये आरोपी शेख फकिरा, शेख कादर कुरेशी,रा बेलखेड हा त्याच्या राहत्या घराच्या ओसरीत त्याचे साथीदार शेख गणी शेख बशीर कुरेशी वय ३२ वर्षे, शेख कलिम शेख फकिरा ,वय १८वर्षे  रा ,बेलखेड यांच्यासह  , सुऱ्या  व रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या गुरांची कत्तल करून हे आढळून आले,  सदर गुरांचे हात पाय तोडलेले होते, अंदाजे किंमत २४००० रुपयाचे गौवंश जप्त करण्यात आले, आरोपी विरुद्ध  कलम  प्राण्यांचा छळ प्रतिबंधक नियम १९६० अन्यवे कलम  ५,५क,९,९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास हिवरखेड पोलीस  ठाणेदार धीरज चव्हाण,  सुनील बगळेकर, श्रीकृष्ण सोळंके, सुमन मैडम,निलेश खंडारे, सर्वेश कांबे, निलेश अस्वार,धीरज साबळे,गणेश कवळे, प्रदीप तायडे ,करीत आहेत,

Previous Post Next Post