सरपंचाच्या घरावर पाण्यासाठी ग्रामस्थांचा मोर्चा...


जळगांव जामोद प्रतिनिधी:- 

दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुरणगाड खुर्द येथील ग्रामस्थांनी सरपंच यांच्या घरी पाण्याचे रिकामी भांडि घेऊन मोर्चा काढला याबाबत सविस्तर वृत्त असे की १४० गांव पाणीपुरवठा योजना अंतर्गत कुरणगाड खुर्द/ तरोडा खुर्द/ तरोडा बु" या तिनहि गावात पाणी पुरवठा सुरळीत सुरू होता परंतु पाणीकर वसुली करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता त्यानंतर गावातील बहुतांश नागरीकांनी पाणीकर भरुन हप्ता झाला तरी पाणी पुरवठा का सुरू झाला नाही याचा जाब विचारण्यासाठी कुरणगाड खुर्द येथील महिलांनी रिकामी भांडि घेऊन सरपंच यांचे घर गाठले असता ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते शंकरराव राठोड, उपसरपंच पती उल्लास पाटील, एकनाथ वडोदे, सोपान देवळे यांनी मध्यस्थी करून त्वरित पाणीपुरवठा सुरू केला यामुळे महिलांना होत असलेल्या त्रासातून मुक्तता झालेचे उपस्थित महिलांच्या चेहर्रावरुन दिसत होते पाणीपुरवठा करण्यामध्ये सुद्धा सरप़ंच राजकारण करत आहेत हे झालेल्या चर्चेतुन नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा गावात सुरू आहे

Previous Post Next Post