शेगाव ता.प्रतिनिधी:-
शेगाव येथील व्यंकटेश नगर मध्ये संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सौ. विमलताई गवळी यांनी दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून उजाळा दिला. यावेळी संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. दुर्गा काळे आणि सचिव कु. वैष्णवी गवळी, कोषाध्यक्ष सौ. स्नेहल जामोदकर यांच्यासह इतर सभासद आणि परिसरातील महिला यांची उपस्थिती होती.