जळगांव जा.प्रतिनिधी:-
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा सत्कार आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त करण्यात आला.सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचे द्वार खुले झाले. त्यामुळेच महिला आजच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात आपले योगदान देऊन देशाला घडविण्याचे काम करीत आहेत.यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष अंकित दाभाडे यांनी विविध क्षेत्रातील महिलांचा पुस्तके देऊन सत्कार केला यावेळी त्यांचे सहकारी प्रणव अवचार,सुरज पाटील स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.