हिवरखेड पोलिसांची अवैध रेती चोरून नेणाऱ्या विरुद्ध कारवाई,


 हिवरखेड प्रतिनिधी:-प्रशांत भोपळे.

हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वारखेड येथे अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या विरुद्ध  हिवरखेड पोलिसांनी  कारवाई केली आहे, वारखेड बाजूला असलेल्या वाण नदीपात्रातुन आरोपी रेती चोरून नेत असल्याची माहिती हिवरखेड पोलिसांनी मिळताच त्यांनी आरोपिना रंगेहात अटक केली, यामध्ये आरोपी राधेश्याम केशवराव म्हसाये,सचिन आकाश खंडेराव,प्रदीप भास्कर वानखडे, रा वारखेड याच्या विरुद्ध कलम ३७९,३४ भांदवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला , आरोपी जवळून कारवाई मध्ये एकूण मुद्देमाल ५,१५००० रुपयाचा माल जप्त करण्यात आला, पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे,

Previous Post Next Post