घरकुल याद्या मध्ये वगळण्यात आलेल्या गरजू लोकांना तात्काळ समाविष्ट करा...


 जळगाव जा.प्रतिनिधी :-

 सन २०१६ /१७ या वर्षातील सर्वेक्षणानुसार जळगाव जामोद तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील समाविष्ट गावांमधील गरजू लोकांची यादी पंचायत समिती कार्यालयात प्राप्त झाली होती.त्यानंतर आता प्रकाशित झालेल्या प्रपत्रक ड यादी मध्ये तालुक्यातील असंख्य गरजू लोकांना वगळण्यात आले आहे.मुळात या तालुक्याची ओळख ही आदिवासी दुर्गम भाग म्हणून आहे. आणि या तालुक्यामध्ये शेतीच्या उत्पन्नावर व्यतिरिक्त दुसरे उत्पन्नाचे स्त्रोत नाही. त्यामुळे या जळगाव जामोद तालुक्यामध्ये अशी काही गरीब कुटुंब आहेत की त्यांच्या घराच्या भिंती पडलेले अनेकांचे विटा मातीचे, काडी कचऱ्यांची आहेत. आणी अशा लोकांना यामधून वगळणे हे एक प्रकारे गरिबावर अन्यांय करणारे आहे.या गरीब गरजू लोकांवर अन्याय होऊ नये याकरता अक्षय पाटील यांनी घरकुला पासून वंचित असणाऱ्या लोकांना व कार्यकर्त्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठले आणि गट विकास अधिकारी यांना संपूर्ण माहिती दिली. गटविकास अधिकारी यांच्याशी फोनवर संभाषण झाल्यानंतर आपण आपल्या पातळीवर सर्वेक्षण करू असे सांगण्यात आले.त्यानंतर विस्तार अधिकारी श्री मोरे साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यात आली.यावेळी वैभव जाणे, शुभम रोठे, अजय गिरी, विनायक पाटील, ज्ञानेश्वर चोपडे, भगवान पाटील, तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post Next Post