जळगांव जा.प्रतिनिधी:-
महाविद्यालयीन विद्यार्थी हे अठरा वर्षा वरील वयोगटातील आहेत त्यांनी लसीचे दोन मात्रा घेतलेले आहेत तर पंधरा वर्षावरील विद्यार्थ्यांचे लसिकरण सुद्धा वेगाने होत आहे. केवळ कोरोनाची भीती दाखवून राज्यभरातील शाळा महाविद्यालय व कोचिंग क्लासेस बंदचा निर्णय शासनाने घेतला निर्णय दुर्दैवी असल्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्यांचे नुकसान करीत असून शाळा बंद है या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे राज्यभरात सर्वच व्यवसाय निर्बंधसहीत सुरू आहेत.तेव्हा सरकारने शाळेला निर्बंधांचे नियम लावून महाविद्यालय कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. सरकारने 26 जानेवारीपर्यंत शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस सुरू करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा शासनाने असे न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जळगाव जामोद तालुका भाजपच्या वतीने दिनांक 20 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे सदर निवेदनावर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, शहराध्यक्ष अभिमन्यू भगत, शाकीर खान, सीमा डोबे, नीलेश शर्मा, वैभव आढाव,गौरव डोबे, अमोल भगत, अरुण खिरोडकर, शिल्पा भगत, सुषमा गोंड, सुरेश इंगळे,पांडुरंग मिसाळ यांच्यासह बहुसंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.