जिल्हा जात पडताळणी समिती विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस निरीक्षक शुभांगी मुकुंद कोरडे (दिवेकर) या काल जाहीर झालेल्या एल एल एम परीक्षेत (master of laws) कायद्याची पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.एल एल एम परीक्षा उतीर्ण झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.शुभांगी कोरडे यांनी सन २०१८ मध्ये एल एल बी सुद्धा प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाल्या होत्या.एल एल एम ही कायद्याची पदवी मिळवणाऱ्या शुभांगी कोरडे जिल्ह्यातल्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत.त्यांनी अकोट शहर,कोतवली,अंजनगाव,चांदुर रेल्वे,वाहतूक शाखा,विशेष शाखा,चिडीमार विरोधी पथक या सह विविध पदावर कर्तव्य पार पाडले.कर्तव्य पार पाडून कुटूंबाची जबाबदारी व लहान मुलीची आईचे सोपस्कार पूर्ण करीत एल एल एम ही कायद्याची महत्वाची पदवी मिळविली.कायद्याचे ज्ञान पोलीस खात्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो.पुढे गुन्हेगारी या विषयावर पीएचडी करण्याचा मानस असल्याचे शुभांगी कोरडे यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक शुभांगी कोरडे (दिवेकर) एलएलएम उतीर्ण...
अकोट तालुका प्रतिनिधी:-सय्यद शकिल.