हिवरखेड नजीक असलेल्या वारी भैरवगड तीर्थक्षेत्रावर नूतन वर्षाच्या २०२२ च्या प्रथम दिवसाचे औचित्य साधून अनेक भाविकांनी दूर दुरून येऊन हनुमंतरायाच्या दर्शनाचा लाभ घेतला, वारी भैरवगड हे तीर्थक्षेत्र एक निसर्गरम्य क्षेत्र असून येथे हनुमान सागर समुद्र तसेच हनुमंत रायाची मूर्ती, राम सीता मूर्ती ,आणि मोठं मोठे हिरवड वृक्ष, सदा वाहणारे गायमुख , मामा भाचाचा प्रसिद्ध डोह, शिवलीग,सर्वत्र वाहणारे जल असे अनेक बघण्यासारखे दृश्य आणि दर्शनाचा लाभ घेण्याचे धार्मिक पर्यटन स्थळ असल्याने व तिन्ही जिल्ह्याच्या जवळचे स्थान असल्याने भाविकांनी या स्थळाला अधिक पसंती दिली, सर्वानी नूतन वर्ष आनंदात जाण्याची पार्थना हनुमतरायाला केली तर अनेक भक्तांनी महाप्रसाद वितरित करून आपला या वर्षातला प्रथम दिवस वारी तीर्थक्षेत्रात घालविला, या तिर्थक्षेत्रावर प्रत्येक समाजाचा व्यक्ती भेट देतो अस हे तीर्थक्षेत्र आहे, हनुमंत रायाच्या मंदिरात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला तर मंदिराच्या वतीने सर्व नियमाचे पालन करण्यात आले येणाऱ्या भाविकांना हनुमंतरायाच्या दर्शनाचा लाभ व्हावा अशी व्यवस्था सुद्धा करण्यात आली,
नुतनवर्षानिमित्त भाविकांनी घेतला वारी भैरवगड तीर्थक्षेत्रावरील दर्शनाचा लाभ,भक्तांचा उसळला जनसमुदाय
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.