वैभव कुमार फिल्मस प्रोडक्शन चे भव्य उद्धग्टान समारंभ संपन्न...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी

वैभव कुमार फिल्मस प्रोडक्शनचे दि. १ जानेवारी २०२२ ला ,संत रविदास महाराज सांस्कृतिक भवन अमरावती येथे चित्रपट निर्माता व अभिनेते अमित कळसकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .यावेळी प्रमुख पाहुणे रावसाहेब गोंडणे ,रमेश खांडेकर ,दिनेश गजभिये ,मिलिंद राऊत ,सुदर्शन खवसे ,जया भारत राऊत , अमित टेंभुर्ण ,आशिष कावरे उपस्थित होते.वैभव कुमार फिल्मस प्रोडक्शन निर्मित अंगणा ( एक प्रेम कथा ) ,विपरीत ( एक विरुद्ध प्रेम कथा ) ,गुरुजी ( दि रिअल हिरो ) ,चावली ( एक सत्य कथा )  हे सर्व चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्माता वैभव कुमार यांनी दिली.कार्यक्रमाचे संचालन अभिनेत्री वैष्णवी दवली हिने केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसठी अभिनेते अमित टेंभुर्ण ,आशिष कावरे ,आशिष खवसे ,सुदर्शन खवसे, प्रतिक सांगोले ,सागर गडलिंग यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमात अमरावती येथील नागरिकांनी एकच केली होती.

Previous Post Next Post