सिंधुताईची पोकळी भरून निघणार नाही - राजकन्या रेवसकर


 शेगांव ता.प्रतिनिधी:-

हजारो अनाथांचा मायेचा आधार असलेल्या माता सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाल्याने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांची पोकळी कधीही भरून निघणार नाही असे प्रतिपादन रिपाई आठवले गटाच्या महिला शहराध्यक्ष सौ.राजकन्या रेवसकर यांनी श्रद्धांजली सभेत ७ जानेवारी रोजी व्यक्त केले.व्यंकटेश नगर मधील राष्ट्रसंत तकडोजी महाराज आश्रम येथे अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रिपाई आठवले गट महिला शहरध्यक्ष शेगांव सौ. राजकन्या रेवसकर यांचेसह ईतर महिला हजर राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सौ.माधुरी शर्मा, सौ. मिथीलेश ठाकुर, कल्पना गावंडे, मीराबाई पाटील, दीपमाला कांबळे, सुशिला त्रिवेदी, लता तिवारी, मंगला सोळंके, कु. चंदा फोकमारे, नलिनी गावंडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Previous Post Next Post