होळी हा सण अगदी जवळ येऊन ठेपला असून गरिबांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप अद्याप पर्यंत झालेली नाही याचे कारण की जळगाव जामोद तालुक्यामध्ये धान्य गोदामांमध्ये पुरेसे धान्य उपलब्ध नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य पोचविल्या गेले नाही. स्वस्त धान्य कार्डधारकांना होळीच्या सणामध्ये धान्य मिळणार की नाही मिळणार याबाबत अद्याप पर्यंत तरी शंका निर्माण झाली असून, त्यांना होळीच्या सणाला धान्य उपलब्ध व्हावे गेल्या दोन महिन्यापासून साखर सुद्धा स्वस्त धान्य दुकानातून मिळाला नसल्यामुळे होळीला साखर मिळतो की नाही मिळत याबाबतही संभ्रम आहे. महागाईच्या या दिवसांमध्ये तसेच ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गरीब दीनदुबळ्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असून जळगाव जामोद तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने तहसीलदार श्रीमती शीतल सोलाट यांना दिनांक 14 मार्च रोजी स्वस्त धान्य गरिबांना मिळण्याकरिता निवेदन देण्यात आले सदर नियोजनामध्ये जळगाव जामोद तालुक्यात सर्व शहरांमध्ये आज पर्यंत स्वस्त धान्य पोहोचले नसून, तसेच या महिन्यांमध्ये मका व ज्वारी चा वाटप असल्यामुळे तसेच सर्व प्रॉब्लेम मागील दोन महिन्यापासून चालू असल्यामुळे दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत असून जळगाव तालुक्यामध्ये शासकीय गोदामात मका आणि ज्वारी तसेच साखर नसल्यामुळे दुकानदारानं पर्यंत ठेकेदार मालक पोहोचता करत नाहीत. याला सर्वस्वी संबंधित ठेकेदार जबाबदार असून ठेकेदाराने मुदतीच्या आत मालक पोचवले गरजेचे असते या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील दुकानदार व तालुक्यातील स्वस्त धान्य कार्डधारक यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याकडे स्थानिक प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर वेळेवर धान्य न पोचवल्याबद्दल कारवाई करण्यात यावी याकरिता जळगाव जामोद प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर दाताळकर कार्याध्यक्ष संजय देशमुख दत्ताभाऊ पाटील अरुण पारवे अरुण साबळे शेख अखिल आर,ए, शेगोकार, अताऊल्ला खान डी बी पाटील शालिग्राम दाते यासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते
होळी आली पण गरिबांना राशनचे धान्य मिळेना! ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे स्वस्त धान्य वितरणात दिरंगाई...
जळगांव जा.प्रतिनिधी:-