पत्रकार हा समाजाचा आरसा असुन समाजात काय सुरू आहे याची वस्तुस्थिती मांडतो. याच पत्रकारांच्या अनेक समस्या असुन त्या मी सोडविण्याचा पुर्णपणे प्रयत्न करणार आहो असे मत धामणगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केले. ते अमरावती येथील एमआयडीसी मध्ये आयोजित हॉटेल प्राईम पार्क येथे आयोजित अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय खुले एकदिवसीय अधिवेशनात रविवारी (ता. १३) बोलत होते. सदर अधिवेशनाचे पहिल्या सत्रात उद्घाटक म्हणून दै. मतदारचे संपादक दिलीप एडतकर हे होते तर आध्यक्षस्थानी दै. हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक हर्षवर्धन पवार, प्रसिध्द उद्योजक चंद्रकुमार उर्फ लप्पीसेठ जाजोदीया, दै. वृत्तकेसरीचे संपादक जयराम आहुजा, नाशिक येथील उद्योजक दिलीप गिरासे समाजसेवक हाजी अब्दुल हमीदभाई, केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, कार्याध्यक्ष युसुफ खान, सरचिटणीस सुरेश सवळे, उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, अशोकराव यावुल, सचिव अशोक पवार, प्रदेश कार्याध्यक्ष कैलासबाप्पू देशमुख, महिला मंच प्रदेशाध्यक्ष जयश्री पंडागरे, प्रदेश सरचिटणीस प्रा. रवींद्र मेंढे, संपर्क प्रमुख बाळासाहेब सोरगिवकर, सदस्य माणिकराव ठाकरे, मनोहरराव चरपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप जोशी, राजेंद्र ठाकरे आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक कैलासबापू देशमुख यांनी करतांना म्हटले की, ११ सदस्यांवर अ. भा. ग्रा. पत्रकार संघाची स्थापना होऊन २५ वर्षामध्ये २२ जिल्हामध्ये काम पोहोचले असुन इतर ५ राज्यात सुध्दा संघटना पोहचली आहे. संघटनेचे काम ऑनलाईन झाले असुन अर्ज सुध्दा ऑनलाईन भरले जाते. कोरोना काळात पेपर बंद झाले होते तेव्हा सर्वप्रथम आवाज अ. भा. ग्रा. पत्रकार संघाने उचलला असे सांगितले. तर उद्घाटक अॅड. दिलीप एडतकर यांनी भाषणात म्हटले की, माणसं जोडणं कठीणं असते आणि त्यात पत्रकारातील माणूस एकत्रित करणं फार कठीण असतं. अमरावती जिल्ह्यातून उदयास आलेली ही संघटना आज महाराष्ट्रासह इतर राज्यात पोहचली आहे ही गर्वाची बाब आहे. अमरावती मध्ये बसुन मुख्यमंत्री, प्रधानमंत्र्यांच्या विरोधात लिहनं सोपं असतं, मात्र ग्रामिण भागात गावगुंडांच्या विरोधात बातमी लिहणं हे खूप कठीण काम आहे. वृत्तपत्रात मराठी भाषेत दुसऱ्या भाषेची भेसळ झाली आहे. कुठे नेऊन ठेवली मराठी माझी ही म्हणण्याची वेळ आली असल्याचे अॅड. दिलीप एडतकर यांनी म्हटले. याशिवाय अध्यक्षीय भाषणात विलास मराठे यांनी सांगितले की, अधिस्विकृती ग्रामिण पत्रकारांना सुध्दा मिळावे याचा समितीने ठराव घेतला. आता त्याची अंमलबजावणी झाली नसुन शासनाकडून निर्णय व्हायचा आहे. सदर काम लवकरच होणार असल्याची ग्वाही दिली. व ग्रामिण पत्रकार हा सर्व वृत्तपत्रांचा कणा आहे. अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.संघटना कितीही असो पत्रकारांच्या सुख, दु:खात एकत्र यावं अशी विनंती विलास मराठे यांनी केली. यावेळी विशेष कार्य करणारे दिलीप गिरासे , हाजी अ. हमीदभाई, अमर जाधव, समाधान दामधर, लप्पीसेठ जाजोदीया, यशपाल वरठे, भाष्करराव बेंगाळ, किर्ती काळमेघ, भरत लोया, वॉटरमॅन विवेक चर्जन, सदानंद जाधव, मंजिरी अलोने, साक्षी तोटे, संतोष शिंदे, डॉ. सुभाष गुर्जर यांचा सन्माचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तर दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रताप अडसड व प्रमुख अतिथी म्हणून प्रतिदिन अखबारचे संपादक नानक आहूजा, जेष्ठ पत्रकार शिवराय कुळकर्णी, पत्रकार संजय शेंडे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवराय कुळकर्णी यांनी संघटनेमध्ये एकत्रित आले तर त्याचे फळ सर्वांना मिळेल असे मत व्यक्त केले. तर नानक आहुजा यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, वृत्तपत्रांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असुन अनेक वृत्तपत्र बंद झालेले आहे. मात्र वृत्तपत्रांना शासनाचे सहकार्य नाही. पहिले कोरोना काळात व एसटी बस बंद असल्यामुळे ४० टक्के सर्क्युलेशन कमी झाले आहे. त्यामुळे पत्रकारांच्या समस्यांसह वृत्तपत्र मालकांच्या समस्येकडे आता शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे असे नानक आहुजा यांनी म्हटले. या कार्यक्रमाचे संचलन किर्ती काळमेघ तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र मेंढे यांनी केले. कार्यक्रमाला महाराष्ट्रासह इतरही काही राज्यातील शेकडो पत्रकारांची उपस्थिती होती. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाेठी अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.🔹पत्रकार कुटूंबाला आर्थिक मदत व सन्मान...
दै. देशोन्नतीचे पत्रकार सचिन सुंदरकर यांचा कोरोना काळात मृत्यु झाला. त्यामुळे या अधिवेशनात त्यांची आई, पत्नी व मुलीचा सन्मान करून त्यांना आर्थिक मदत करण्यात आली.
🔸अधिवेशनात२१ ठराव पारित....
पत्रकार भवन बांधकाम करणे, पत्रकारांना शहरी व ग्रामिण भागातील म्हाडा मार्फत घरकुल योजना, सुरक्षिततेच्या दृष्टीने विमा योजना, शासकीय समित्यांवर पत्रकारांची नेमणुक, पत्रकारांना पाच वर्ष सेवा पुर्ण झालेले आहे अशांना मानधन ५ हजार रूपये महिना लागू करावा, ६० वर्षानंतर पेंशन योजना लागू करावी, पत्रकारांवर एखाद्या प्रकरणात गुन्हा दाखल व्हायच्या पहिले जिल्हाधिकारी यांच्या मार्फत चौकशी करूनच गुन्हा दाखल व्हावा, वृत्तसंकलनच्या कामाकरिता विनाअट बस सवलत मिळावी, रेल्वेतही सवलत मिळाली, अधिस्विकृतिच्या सुविधा देण्यात याव्या, पत्रकारांचा आकस्मिक मृत्यु झाल्यास त्याकरिता निधी ठेेवण्यात यावा, पत्रकारांची तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, पोर्टल व युट्यूब ची नोंद करण्यात यावी, लघुउद्योगाकरिता बिनव्याजी कर्ज मिळावे, वृत्तपत्र एजंच ची कामगार म्हणून नोंद करून त्यांना लाभ देण्यात यावा यांसह २१ ठराव संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांनी मांडले व सर्वानुमते मंजुर करण्यात आले. ते शासन दरबारी मांडण्यात येणार आहे.अधिवेशनाचे समारोपात पालकमंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चु कडु यांचे शुभेच्छा संदेश सरचिटणीस सुरेश सवळे यांनी वाचून दाखविला.त्यानतर त्याची आई इंदिराबाई यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली देण्यात आली.तसेच अधिवेशनाला महाराष्ट्र राज्य कार्यालय प्रमुख मंगेश राजनकार, राज्य संघटक अभिमन्यू भगत,बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष आश्विन राजपुत,जळगांव जामोद तालुकाध्यक्ष गणेश भड,सचिव अनिल भगत,विनोद वानखडे,राजकुमार भड,संतोष कुलथे, विनोद चिपडे,गणेश गिर्हे,राहुल निर्मळ, श्रीधर आव्हेकर,दत्तु दांडगे,विठ्ठल गावंडे,मंगल काकडे,गजानन खिरोडकार,गजानन सोनटक्के, अमर तायडे, विजय वानखडे,शिवदास सोनोने, योगेश म्हसाळ, अशोक टाकळकर, अनिल दांडगे, मनिष ताडे,अमोल भगत व जळगांव जामोद येथील पदाधिकारी व सदस्य यासह राज्यभरातील हजारावर पत्रकार उपस्थित होते यात महिला पत्रकांचाही समावेश होता.