कुष्टा बु.शेतशिवारातील शेततळ्यात ११ वर्षीय मुलींचा बडून मृत्यू,जीवाची बाजी लावत वाचवयाला गेलेल्या बाजीलालचा ही मृत्यू..


राजु भास्करे / अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

अचलपूर तालुक्यातील कुष्टा बुद्रुक येथे 13 मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता च्या सुमारास गावालगतच असणाऱ्या शैलेश हरिदास नाथे यांच्या शेतातील शेततळ्या नजिक गावातीलच अकरा वर्षीय हर्षाली विनोद वांगे मुलींचा   अचानक तोल गेल्याने  ती शेततळ्यात बुडाली असता शेतातील  रखवालदार यांचा मुलगा २५  वर्षीय   युवक बाजीलाल मुन्ना कास्‍देकर तिला वाचविण्यासाठी गेला असता त्याचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला गावालगत असणाऱ्या शेततळ्यात एका मुलीचा व मुलाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे घटनेची माहिती गावात कळताच शेततळ्यात नजीक लोकांनी गर्दी करत पोलीसांना माहिती दिली प्रथोट पोलिसांनी दोघांचे मृतदेह शोध मोहीम सुरू केली होती.

Previous Post Next Post