बिजूधावडी शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी रोख बक्षीस...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

गेल्या काही दिवसा पूर्वी  अमरावती जिल्हा धारणी तालुक्यातील बिजूधावडी शेतशिवारात एका तीस ते पस्तीस वयोगटातील अज्ञात महिलेचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत परिसरातील नागरिकांना दिसून आला होता.सदर महिलेची ओळख पटविण्यासाठी धारणी पोलिसांनी तारेवरची कसरत केली तरीसुद्धा ओळख पटू शकली नाही.अखेर सदर महिलेची ओळख सांगणाऱ्याला व अज्ञात आरोपीची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी जाहिर बक्षीस जाहिरात केले आहे.पोलिसांनी जाहीर केलेल्या पोस्टर नुसार सदर महिलेचे वर्णन रंग काळा उंची पाच फूट वय तीस ते पस्तीस असून पिवळ्या रंगाचे ब्लाउस व पिवळ्या रंगाची डिझाईन असलेली हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच रक्ताने मखलेली पांढऱ्या रंगाची पॅरागॉन कपंनीची स्लीपर चप्पल आहे.सोबतच पांढऱ्या रंगाचा लाल पिवळ्या डिझाईन चा दुपट्टा आहे.दोन्ही हातावर गोंधलेले असून पायात धातूच्या बीचव्या व चैनपट्टी आहेत.अश्या वर्णनाच्या महिलेची ओळख देणाऱ्यास पोलिसांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर बक्षीस जाहीर केले आहे.माहिती देण्यासाठी पी आय सुरेंद्र बेलखेडे 8169540053 पी आय विलास बोपटे 9823725890ग्रामीण गुन्हे शाखा 0721-2665920यावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.धारणीच्या इतिहासात प्रथमच एका अज्ञात मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी रोख बक्षीस जाहीर करण्यात आले.ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांच्या संवेदनशीलता व प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Previous Post Next Post