प्रशांत भोपळे/हिवरखेड.
हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम वारी मार्गावर पोलिसांनी गुप्त माहितीवरून नाकाबंदी केली असता त्यांना चार गुरांना आरोपी मारहाण करत हाकलत दिसून आला यावेळी आरोपी जवळून अवैध चार गुरे जप्त करण्यात आली, प्रत्येकी १, गुरे २५००० रुपये किमतीचे असून एकूण चार गुरांची किंमत १ लाख रुपये आहे, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आरोपी ताजीमोद्दीन विक्रामोद्दीन वय (४०) वर्षे रा, हिवरखेड आकाश अब्बास मोरे रा झरीबाजार या दोन्ही आरोपीला अटक केली असून आरोपी विरुद्ध कलम ४२९, ३४ ९,९,(अ) प्राणी संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला , पुढील तपास हिवरखेड ठाणेदार मनोज लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार सुरवाडे करीत आहेत,