चलनातील नोटांना नका लावू हातांनी कलर , मग तुम्हीच मनाल बोटांनी ह्या नोटा घेत नाही आम्ही हातांनी,


प्रशांत भोपळे/हिवरखेड.

हिवरखेड येथेच नव्हे तर संपूर्ण राज्यात रंगपंचमी हा उत्सव साजरा केला जातो व हा स्नेह,प्रेम, उत्सव, वाढवण्याचा  उत्सव आहे हा उत्सव पारंपरिक पद्धतीने सर्व जाती धर्माचे लोक साजरा करतात , रंगपंचमीला रंगाची उधळण करतात ,होलिका दहन  करतात सर्वत्र होळीला रंगपंचमीला रंगाची उधळण दिसून येते परंतु याच बरोबर आपल्याला इतरांना रंग लावत असताना आपल्या किंवा इतरांच्या खिशातील पैशांची नोटांची काळजी घ्यावी लागणार आपण रंग खेडतांना  आपल्या हातांच्या बोटांनी नोटांना रंग लागतो व मग आपण ते पैसे घेऊन बाजारात जातो तर व्यवसायिक दुकानदार रंग लागलेली नोट घेत नाहीत मग त्या नोटिच करायचं तरी काय ? याला जबाबदार कोण ? असे उलट सुलट विचार करून आपण वाद विवाद अडकतो असे  बऱ्याचदा हिवरखेडमध्ये घडून आले  त्याकरिता आपणच आपल्या पैशाची काळजी घ्यावी,  आपण ज्या करिता धळपळ करतो त्याचीच जर माती होईल तर याला जबाबदार आपण ठरू हे लक्षात घेऊनच आपण आपले प्रदूषण मुक्त व  आपले पैसे सुरक्षित ठेवू , पाण्याचा नास नाही करू, असा संकल्प निर्माण करावा,

Previous Post Next Post