पिंपळगाव काळे येथील राम पिंजरकर या तरुणाची पोलीस उपनिरीक्षक पीएसआय पदी नियुक्ती...


पिंपळगाव काळे प्रतिनिधी:-मंगल काकडे.

जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम पिंपळगाव काळे येथील रहिवासी तसेच शेतकरी कुटुंबातील राम श्रीराम पिंजरकार या तरुणाची पोलीस उपनिरीक्षक पी.एस.आय.पदी निवड.राम पिंजरकर या तरूणाणे सन २०१२ ला आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती गरीब असून सुद्धा जिद्द चिकाटी अंगी बाळगून वारंवार येणाऱ्या अपयशाला खचून न जाता आपले ध्येय गाठण्याचे सामर्थ्य त्याने दाखवले. आणि त्याच्या मेहनतीचे फळ त्याला ८ वर्षानंतर मिळाले. शेवटी तो पोलीस उपनिरीक्षक झालाच. नवीन तरुण पिढीला त्याच्याकडून एक प्रेरणा मिळाली त्याच्या या निवडीने पिंपळगाव काळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. प्रबळ इच्छाशक्ती. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेवटी राम श्रीराम पिंजरकार. पी.एस.आय. पोलीस उपनिरीक्षक पदी त्याची निवड झाली.पी.एस.आय.पदापर्यंतचा ८ वर्षाचा प्रवास हा आजच्या तरुणासाठी प्रेरणादायी आहे.

Previous Post Next Post