बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा जमा करून होळी साजरी केली.महाविद्यालयांमध्ये जर होळी करायची असेल तर महाविद्यालय परिसरातील कचरा जमा करून सोबत कचऱ्याच्या होळीची विधिवत पूजा करावी व पर्यावरणाचे संरक्षण करण्याची व चांगले विचार जोपासण्याची होळी समोर शपथ घ्यावी असे सांगून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना होळी करण्यास प्रेरित केले..तसेच आम्ही शपथ घेतो कि होळी करण्यासाठी फक्त कचरा जमा करणार व कचऱ्याची होळी करणार आणि समाजाला तसे करण्यास प्रवृत्त करणार, पर्यावरणाचे संरक्षण करणार, चांगल्या विचारांची जोपासना करणार, जय हिंद जय भारत अशाप्रकारे होळी समोर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणत होळीचे दहन केले. या होळीचा एक व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल केला की जेणेकरून समाजाने अशाच प्रकारच्या होळीचे दहन करावे की त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही आणि आजूबाजूचा परिसर साफ सुत्रा होईल.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संकेत गई ऋषिकेश खोद्रे ऋषिकेश काकडे पवन बोदडे संकलेन खान भूषण धुंदले प्रसन्न वडनेरकर शिक्षिका राऊत मॅडम भोपळे मॅडम शारीरिक शिक्षण विभाग व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली परिसरात पडलेल्या कुडा-कचऱ्याची होळी..
पिंपळगाव काळे/मंगल काकडे.