महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी संपाला सुरुवात...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

महसूल कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी लक्षणीक संपाला आज दिनांक 28 मार्च पासून सुरुवात झाली असून या संपामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी असून महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता शासनाला निवेदन दिले असून त्यावर अद्यापपर्यंत सुद्धा शासनाने तोडगा काढलेला नसून त्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात याकरिता आज पासून सर्व महसूल कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे जोपर्यंत शासन तात्काळ सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असा इशाराच कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे यामध्ये जळगाव जामोद येथील  वर्ग क आणि वर्ग ड चे कर्मचारी सहभागी झालेले आहेत. महसूल कर्मचारी संघटना जळगाव जामोद च्या वतीने तसे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार जळगाव जामोद यांना देण्यात आले आहे.
 

Previous Post Next Post