तेल्हारा येथे आमदार बांगर यांच्या पुतळ्याचे दहन...


तेल्हारा विशेष प्रतिनिधी संघपाल गवारगुरु

तेल्हारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर आरोप करणारे कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार.संतोष बागर यांच्या तेल्हारा येथील उद्यान चौकात प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी अशोक दारोकार, तेल्हारा पं समिती गटनेते संजय हिवराळे, विकास पवार,  सरपंच संघर्ष वानखडे यांच्या सह वंचित आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Previous Post Next Post