तेल्हारा विशेष प्रतिनिधी संघपाल गवारगुरु
तेल्हारा तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पंचगव्हाण येथे गट ग्रामपंचायत खेल देशपांडे-उबारखेड येथील दिव्यागं नागरिकांना ता.29 मार्च रोजी दिव्यागं निधीचा वाटप करण्यात आला सरपंच अफरोजा शेख यासीन यांच्या हस्ते खेलदेशपांडे उबारखेड येथील 12 दिव्यागांन प्रत्येकी 500 रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामसचिव ठाकूर ग्रामसचिव मंडासे उपसरपंच अनिल भाकरे, शेख यासीन शेख मन्नान, ग्रामपंचायत सदस्य जाफर खा काले खा, प्रफुल मोरे, दिनेश गवार गुरु, सय्यद नादु, संदीप मोहन कार, गणेश पानझाडें, सचिन झापर्डे, मधुकर कोगदे, देवानंद गवारगुरु, विकास गवारगुरु, उमेश अढाऊ इत्यादी उपस्थित होते.
