रस्त्यातील अतिक्रमण काढण्याकरीता सावरगाव येथे पाण्याच्या टाकीवर चढुन शोले स्टाईल आंदोलन...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगांव जामोद तालुक्यातील सावरगाव येथे 31 मार्च रोजी शेख बुडन यांच्या घरासमोरील असलेले अतिक्रमण काढण्यासाठी सावरगाव येथील रहिवासी असलेले बाबुराव पाटील,भागवत कराळे,सीताराम कडरकार यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण केलेले असून ते घरासमोरील अतिक्रमण काढावे तसेच ग्रामपंचायत च्या वतीने बांधण्यात येणाऱ्या नालीचे बांधकाम अतिक्रमण काढल्याशिवाय करू नये अशा प्रकारची लेखी तक्रार त्यांनी गट विकास अधिकारी जळगाव जामोद व तहसीलदार जळगाव जामोद यासह ग्रामपंचायत चे सचिव सरपंच यांना दिनांक 28 जानेवारी रोजी दिली होती. परंतु आजपर्यंत दोन महिन्याचा कालावधी उलटूनही सदर प्रशासनाच्यावतीने त्यावर कुठलीच कारवाई न झाल्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीवर चढून बाबुराव पाटील, भागवत कराळे, व सिताराम करडकार यांनी शोले स्टाईल आंदोलन केले. जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवर आंदोलन करू अशी भूमिका यावेळी या तिघांनी घेतली होती. यावेळी पोलीस पाटील सावरगाव आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशन यांनी मध्यस्थी करून सदर आंदोलन तात्पुरते स्थगित केले महत्त्वाचे म्हणजे हे आंदोलन सुरू असताना गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद होते. यावेळी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना काही आरोग्याचा त्रास होत असला तर यावेळी आंदोलन करण्यासाठी त्या ठिकाणी कोणतीही आरोग्य डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते हे विशेष.

Previous Post Next Post