जळगांव जा.प्रतिनिधी:-
"सध्याचे तुमचे आयुष्य हे घडण्याचे आयुष्य आहे. एका फार चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात. हा तुमचा संघर्षाचा काळ आहे. ह्या काळात सुरुवातीला त्रास मात्र जरूर होईल पण तुमचे भविष्य उज्ज्वल करणे तुमच्या हातात आहे. भविष्यात उच्च ध्येय गाठण्यासाठी उराशी मोठी स्वप्न पहा, लहान स्वप्नांच्या मागे धावू नका.आपल्याला कोणी दगड जरी संबोधले तरी आपण नारळ फोडायचा दगड न बनता आपल्याला मूर्तीचा दगड बनायचं आहे, मूर्ती घडवताना सुरुवातीला त्रास जरी झाला तरी आयुष्यभर मात्र त्या मंदिरात येणारे सर्व आपल्या समोर नतमस्तक होतील, परंतु त्रास होऊ नये म्हणून जर आपल्या मूर्ती घडू द्यायची नसेल तर आयुष्यभर आपल्यावर नारळ फोडल्याने त्रास होणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून आपण नारळ फोडायचा दगडं न बनता दैवी मूर्ती साकारणारा दगड बना", असे आवाहन ठाणेदार पो.नि. सुनील अंबुलकर यांनी केले.ते दिनांक रोजी तालुक्यातील ग्राम चावरा इलोरा येथे सातपुडा शिक्षण संस्था द्वारा संचालित व डॉ० पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित
स्वा.वि.ग.इं. कृषि व उद्यानविद्या महाविद्यालय, तसेच कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, जळगाव जामोद, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबीराच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सातपुडा शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. संदीप वाकेकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या आशिया श्रमसंस्कार शिबिर आणि मधून विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी तसेच सेवाभावी वृत्ती निर्माण होते असे उद्गार आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. संदीप वाकेकर यांनी काढले.
-------------
मोफत आरोग्य निदान करून शिबिराचे समारोप...
श्रम संस्कार शिबिराच्या शेवटच्या दिवशी जळगाव जामोद येथील वैद्यकिय तज्ञ् मंडळी डॉ० संदीप वाकेकर(बालरोग तज्ञ), डॉ० राम भोपळे (दंत चिकित्सक),डॉ० राजेश वाकोडे (जनरल फिजिशियन्) यांनी ग्राम चावरा(इलोरा) येथील रुग्णांची मोफत तपासणी व् निदान वऔषधोपचार केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ०.संदीप वाकेकर् तर प्रमुख् उपस्थिती मडाखेड खुर्द सरपंच राजेश सित्रे पाटील, अध्यक्ष, श्री सचिन वारुळकर्, पोलिस् पाटील गोविंदा लोधे, ग्राम पंचायत सदस्य विजुभाऊ तिजारे, ज्ञानेश्वर तिजारे, श्री भानुदास भटकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे, प्रा.तुळशीराम राठोड, प्रा.राहुल तायडे, प्रा. प्रमोद डव्हळे, प्रा. जिव्हेश् साळी, प्रा.स्नेहल बायस्कर्, प्रा.वैभव हागे, प्रा.हरिदास वाशीमकर यांनी परिश्रम घेतले.
