लोणार शहरात असलेल्या टॉवर पैकी ४ विविध कंपनीने अनधिकृत मोबाईल टॉवर सील करण्याची कारवाई मुख्यधिकारी विठ्ठल केदारे यांनी केली. लोणार हद्दीमधील नगरपालिकेमध्ये नोंद असलेली टॉवर पैकी काही टॉवर अनधिकृत आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता टावर उभारणी केली आहे व अनधिकृतरित्या वीज जोडणी घेतली आहे.अशा ४ टॉवर वर नगर परिषद मार्फत कारवाई करण्यात आली आहे. नगर परिषदने वारंवार सूचना देऊनही व कागदोपत्री व्यवहार करून ही कोणत्याही प्रकारची परवानगी त्यांनी घेतलेली नाही.या टॉवर वर सव्वा कोटी रूपयाची थकबाकी आहे.त्यामुळे आज नगर परिषदने धडक कारवाई केली. व अनधिकृत टॉवर सील केले यावेळी पथकप्रमुख एस.एस.थोरात ,करनिरीक्षक अन्वर शहा, फुलचंद व्यास, संजीव ऐनेवार, अशोक निचंग,गजू बाजड, प्रभू सानप,सूर्यवंशी, किरण गरकळ,नागरे,अशोक मानकर पोलीस विभागाचे भगवान नागरे,विजय आढाव आदी उपस्थित होते.
लोणार शहरातील ४ अनधिकृत मोबाईल टॉवर सिल..मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांची कारवाई..
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
