आसलगाव केंद्र शाळा पुर्वतयारी प्रशिक्षण शिबीर संपन्न....


जळगाव जामोद प्रतिनिधी:- 

मुलांच्या मनातील शाळेची भीती घालवून  विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आसलगाव केंद्रातील शिक्षकांचे व अंगणवाडीसेविकांचे शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण जि प केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा आसलगाव येथे 30 मार्चला अतिशय उत्साहात पार पडले .सन २०२२-२३ पासून अभ्यासक्रमात अनेक बदल होत आहे. अंगणवाडी, बालवाडी ही प्राथमिक शाळा जोडली जाणार आहे.  शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांना जाणून घेत, शाळेत दाखल झालेल्या शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे सोपे व्हावे म्हणून येणाऱ्या सत्रात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आसलगाव केंद्राचे शाळापूर्व तयारी प्रशिक्षण केंद्रीय शाळा आसलगाव येथे पार पडले. या ठिकाणी एक अभिरूप पालक मेळावा घेण्यात आला. यामध्ये सुलभक पूंजाजी ताडे व किशोर बोदडे यांनी शाळापूर्व तयारी बद्दल माहिती सांगितली. त्यानंतर केंद्राचे केंद्रप्रमुख  महादेव कुवारे यांच्या मार्गदर्शनात केंद्रातील शिक्षकांनी गावातील विविध पदाधिकाऱ्यांच्या व पालकांच्या भूमिका सादर करून मेळावा पार पाडला. गावातील विद्यार्थ्यांच्या  मदतीने शाळापूर्व तयारी प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक पार पाडण्यात आले. मेळाव्यात आसलगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, पहिली ते पाचवीचे सर्व शिक्षक ,व अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या .प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन अनिल भगत तर आभार प्रसेंनजित तायडे यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी साधन व्यक्ती सय्यद सर,सौ. लता भड, गोपाल घाटे , विजय अवचार, प्रमोद इंगळे, सत्यजित बनसोड , सुखदेव भगत, सुरेश जाधव  , ना. पा. बगाडे, जावेद पटेल यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post