जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये जामोद केंद्रनिहाय शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिर 30 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. मुलांच्या मनातील शाळेची भीती घालवून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळेमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सुनगाव येथे जामोद केंद्रातील शिक्षकांचे व अंगणवाडीसेविकांचे शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण संपन्न झाले. यामध्ये सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनीताताई सोनटक्के गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार व शाळेचे मुख्याध्यापक ताडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व प्रशिक्षण अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती माजी उपसभापती महादेवराव धुर्डे, पत्रकार अनिल भगत गजानन सोनटक्के यांच्यासह जामोद केंद्राचे प्रमुख नितीन सातव यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण अभियानाला सुरुवात झाली. यामध्ये सन 22-23 पासून अभ्यासक्रमात अनेक बदल होत आहेत अंगणवाडी बालवाडी ही प्राथमिक शाळेला जोडले जाणार आहेत.शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांना जाणून घेत शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षकांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे सोपे व्हावे म्हणून शाळापूर्व तयारी प्रशिक्षण घेण्यात आली केंद्रातील शिक्षकांनी गावातील विविध पदाधिकाऱ्यांच्या व पालकांची भूमिका तसेच सरपंच ग्रामसेवक यांच्या भूमिका सादर करून मेळावा मेळावा पार पाडला. या शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण अभियानाला जामोद केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. यासह पदवीधर शिक्षिका अस्मिता शिरसागर, जामोद शाळेचे मुख्याध्यापक एम आर इंगळे गणेश सातव तथा सुलभक किरण वाडेकर सचिन डोंगर दिवे इत्यादींनी कार्यक्रमात कृतीयुक्त सहभाग घेतला यासह विविध व्हिडीओ क्लिप दाखवून शाळा पूर्वतयारी अभियान कसे राबवावे याबद्दल माहिती देण्यात आली तसेच प्रशिक्षणार्थ्यांना विविध कृतीयुक्त भूमिकांनी अभियान पार पाडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनगाव शाळेच्या मुख्याध्यापक ताडे सर,अस्मिता क्षिरसागर,संदिप सारोकार,योगेश सहावे,बुटे सर,निकमसर यांचेसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेत कार्यक्रम उत्साहात पार पाडला..
सुनगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण शिबीर संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
