सेंट पॉल ऍकॅडमी हिवरखेड येथे संगीतमय पाडवा पहाट चे आयोजन...




हिवरखेड प्रतिनिधी:-प्रशांत भोपळे.

हिवरखेड येथील अनेक सामजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सेंट पॉल अकॅडमीहिवरखेड तर्फे संगीतमय पाडवा पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमामध्ये सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडची विद्यार्थी व सिफणी मेलोडीज, अमरावती यांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक लोकजागर मंचचे श्री अनीलभाऊ गावंडे राहतील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ उद्योगी श्री प्रमोदजी चांडक हे राहणार आहेत.गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो.शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी घराबाहेर उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. सेंट पॉल एकेडमी शैक्षणिक कlर्यासोबतच सांस्कृतिक उद्बोधन व भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचा ही मोठं काम करत असल्याचा आपल्याला पाहायला मिळतेच व सेंट पॉल ऍकॅडमी पालक वर्गाने व हिवरखेड वासियांनी तसेच तेल्हारा तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आनंद घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री नवनीत लखोटीया , संस्थेचे सचिव प्रमोद चांडक , संस्थेचे उपाध्यक्ष लुंकरण डlगा  व शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी  यांनी केले आहे

Previous Post Next Post