पुलगावकरांना अनिरुद्धने केले मंत्रमुग्ध..पाडवा पहाट ला उत्स्फूर्त प्रतिसाद...


राजु भास्करे /वर्धा 

कोरूना मुळे लागू निर्बंध मुक्त केल्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर साजरा होणारा गुढीपाडवा सण वर्धा जिल्ह्य़ातील पुलगाव येथिल गावकऱ्यांनी पाडवा पहाटला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने साजरा केला. शहरातील पंडित दीनदयाल उपाध्याय चौक नाचणगाव रोड, पुलगाव येथे संस्कार भारती व विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था पुलगावच्या वतीने २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले. या पाडवा पहाट कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी व गायिका गौरी शिंदे तर निवेदक नितीन भट सहभागी होते . सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुलंगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शैलेश शेळके व आर के विद्यालयाचे प्राचार्य सुधाकर गोरडे सर यांच्या हस्ते गुडी चे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली . कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्कार भारतीचे अध्यक्ष बबन बरवड, प्रमुख पाहुणे केशवराव दांडेकर, उद्घाटक सुधाकर गोरडे सर व पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, विवेकानंद नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव गणेशपुरे, उपाध्यक्ष प्रदीप पांडे , विजयराव निवल उपस्थित होते.कार्यक्रमातील अध्यक्ष बबन बरवड यांचे स्वागत राजेश देशपांडे तर उदघाटक सुधाकर गोरडे यांचे स्वागत हर्षल काळे यांनी केले, प्रमुख अतिथी शैलेश शेळके यांचे स्वागत विठ्ठलराव वानखेडे यांनी तर प्रमुख अतिथी केशवराव दांडेकर यांचे स्वागत सागर तुरक यांनी केले. सुरेशराव गणेशपुरे यांचे स्वागत विनोद सावसाकडे यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाला रंगत आणणारे कलावंत अनिरुद्ध जोशी यांचे स्वागत सुबोध चचाने तर गायिका गौरी शिंदे यांचे स्वागत संगीता देशमुख यांनी केले. वादक रामेश्वर यांचे अनंत बोबडे तर प्रवीण जोंधळे यांचे वर्षा बाभळे, विरु गावंडे यांचे राजेश टिपसे,निवेदक नितीन भट यांचे इरावती टिपसे, तबला वादक मोरेश्वर यांचे गणेश इंगळे यांनी स्वागत केले.मुंबईचे कलावंत सारेगमप व सूर नवा ध्यास नवा विजेता गायक अनिरुद्ध जोशी व सुप्रसिद्ध गायिका गौरी शिंदे व त्यांचे सहकाऱ्यांनी पाडवा पहाटची रंगत वाढविली.कार्यक्रमाला देखणा करण्यास सुंदर व देखणी रांगोळी सागर परके व कस्तुरी रवींद्र गांजरे यांनी साकारली, तर पहाट ची सुरवात संस्कार भारतीचे ध्येय गीताने करण्यात आली. ध्येय गीत वर्षा बाभळे व , ऋज्युत देशमुख, नारायणी चचाणे, ईश्वरी नगरगडे,माधुरी धोपाडे,मिताली गुजर, ज्ञानेश्वरी सोनोने, भार्गवी कुडे, संकेत बाभळे संच यांनी गायिले.कार्यक्रम उत्साहात पार पाडण्या करिता  संस्कार भारतीचे अध्यक्ष बबन बरवड ,उपाध्यक्षा प्रज्ञा हणमंते, सचिव सुबोध चचाने ,सहसचिव हर्षल काळे,राजेंद्र देशपांडे, विठ्ठलराव वानखेडे, विनोद सावसाकडे , संदीप बोरकुटे, सागर तुरक, श्रवण मंडले, संतोष बैतुले, नितीन बडगे, विजय धोपटे, विजय भांडे, संगीता देशमुख, मंदा तरंगे, वर्षा बाभळे,इरावती टिपसे, रवि पाठक,  विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश गणेशपुरे , उपाध्यक्ष प्रदीप पांडे , मुख्य कार्यकारी अधिकारी मानवेंद्र देशमुख , व्यवस्थापक अतुल लोणकर यांनी सहकार्य केले, कार्यक्रमाचे संचालन मंदा तरंगे तर आभार प्रदीप पांडे यांनी मानले.

Previous Post Next Post