बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र व जळगाव जामोद तालुक्यातील पळशी वैद्य या छोट्याशा गावांमधील व परिसरामध्ये भाऊसाहेब बी .एस. पटेल सर या नावाने परिचित असलेले बापूमिया सिराजोद्दीन पटेल यांचे द्वितीय चिरंजीव ऍड हमीद पटेल माजी प्रधान सचिव विधी व न्याय विभाग महाराष्ट्र शासन तसेच माजी सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची महाराष्ट्र शासनाने दिनांक११ मार्च २०२२ रोजी राजपत्र प्रसिद्ध करून राज्यातील नागरिकांच्या मागास वर्गाच्या (इतर मागासवर्गांच्या) बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय मागासलेपणाच्या स्वरूपाचे परिणाम यांचे समकालीन व अनुभवा धिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी समर्पित आयोग महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करून अशा महत्त्वपूर्ण आयोगाच्या सदस्यपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.अँड हमीद पटेल यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव असताना महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागातील कर्मचाऱ्यां करीता बॉम्बे पोलीस ॲक्ट अस्तित्वात होता तेव्हा न्यायालयीन प्रक्रिये मध्ये पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना खूप अडचणी येत होत्या त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनास पोलीस कर्मचाऱ्यांना करता कायदा करण्याचे निर्देश दिले होते तेव्हा त्यांनी पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना करीता महाराष्ट्र पोलीस कायदा २०१४ चा मसुदा तयार करून तो महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर केला तेव्हा न्यायालयाने असा कायदा देशांमध्ये सर्वच राज्यांनी तयार करावा व लागू करावा असे निर्देश दिले होते .आज तो कायदा महाराष्ट्रातील पोलिस विभागाची ख्याती वाढवणारा म्हणून अमलात आहे जळगाव तालुक्यामधील पळशी वैद्य येथील पटेल परिवार हा सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर असून पटेल परिवारा मधील चौथी पिढी शैक्षणिक क्षेत्रात असून तिसऱ्या पिढीमधील उतुंग व्यक्तिमत्वाचे धनी व वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित अशा जे.जे. हॉस्पिटल चे माजी व्हॉईस डीन डॉक्टर सादिक पटेल यांना सुद्धा शासनाने प्रोफेसर इमेरिटर्स म्हणून त्यांची आजीवन सेवा घेण्याकरीता विशेष नियुक्ती केली आहे महाराष्ट्र शासनाचे लोकसेवा आयोगाचे सदस्य असताना ऍड हमीद पटेल यांनी उत्तीर्ण उमेदवारांना मुंबईला न बोलावता विभाग निहाय मुलाखती घेण्याचे नियोजन केले व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना थोडा का होईना परंतु त्यांचा त्रास कमी केला अशा अभ्यासपूर्ण व्यक्तीची निवड हे आज महाराष्ट्र राज्यामधील तमाम इतर मागासवर्गीय नागरिकांना राजकीय आरक्षण देणे करता घठीत केलेल्या आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे ही बुलढाणा जिल्ह्यास भूषणावह व अभिमानास्पद बाब आहे इतर मागास वर्गाला भविष्यात राजकीय व सामाजिक आरक्षण महाराष्ट्र शासनामार्फत घटित आयोगाच्या माध्यमातून व्हावे म्हणून एका अभ्यासू व्यक्तीच्या नियुक्ती करण्यात आली.
ऍड.हमीद पटेल यांची इतर मागासवर्गाच्या समर्पित आयोग सदस्यपदी नियुक्ती...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-