जि प कें म प्रा शाळा वडशिंगी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत. अध्यक्षपदी सौ.नीलादेवी मानकर तर उपाध्यक्ष पदी गजानन भगत यांची निवड..


जळगांव जा.प्रतिनिधी:-

दिनांक 23 मार्च 2022 रोजी जळगांव जामोद तालुक्यातील सर्वाच्या परिचित असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी पालक सभा आयोजित करण्यात आली होती.सदर पालक सभेतमध्ये शासनाच्या नियमानुसार प्रत्येक वर्ग,जात संवर्ग,महीला,वंचित दुर्बल घटक यातील पालकांमधून सदस्यांची आणि निवडून आलेल्या सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची सर्वानुमते करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ निलादेवी रामेश्वर मानकर यांची तर उपाध्यक्ष पदी-गजानन रमेश भगत यांची निवड करण्यात आली.यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पदी ११ सदस्यांची निवड केली ती पुढीलप्रमाणे -१)सौ नीता राहुल भगत,२)सौ राधिका मंगेश लहासे,३)सौ गायत्री प्रमोदगिर गिरी,४)सौ उर्मीला देविदास हागे,५)सौ रेणुका संदीप ढगे,६)श्री वकिलखा महेबुबखा,७)श्री नितिन लक्ष्मण निमकर्डे,८) बळीराम श्रीराम रहाटे,९) समाधान गडबडसिंग सोळंके,१०) समाधान राजाराम मानकर,११) दिनेश श्रीराम भड,बालविकास तज्ञ म्हणून- डॉ नीळकंठ राठी तर सचिव पदी-सौ शोभा सारंगधर गोमासे.समिती गठीत करण्यासाठी डॉ सुपडा इंगळे सर यांनी मोलाचे सहकार्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापिका सौ शोभा गोमासे यांनी काम पाहिले.नवीन शाळा व्यवस्थापन समिती चे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले तर मागील समितीने केलेल्या कार्याबद्दल माजी अध्यक्ष श्री वकिलखाआणि त्यांचे सहकारी यांचेही स्वागत करण्यात आले.शाळेसाठी सर्वोत्तम कार्य करत राहू असे नवीन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांनी पालकांना आश्वस्त केले.निवडीनंतर नवीन समितीचे सरपंच पती सुनीलभाऊ वानखडे यांनी अभिनंदन करून शाळेसाठी ग्रामपंचायत कडुन सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल आणि शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वस्त केले.शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत आणि सर्व गांवकरी यांच्या परस्पर सहकार्याने शाळेचा सर्वांगिण विकास साधला जातो हे वडशिंगी च्या बाबतीत सिध्द झाले.

Previous Post Next Post