जळगाव जामोद प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र यु डी आय डी कार्ड वाटप शिबिर संपन्न झाले. जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात 21 मार्च रोजी ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या शिबिरात ६०० दिव्यांग सहभागी झाले त्यापैकी २६६ दिव्यांगांना प्रमाणपत्र वैश्विक यू.डी .आय.डी कार्ड चा लाभ देण्यात आला शिबिरामध्ये डॉक्टर जयंत सोनवणे नाक कान घसा तज्ञ , डॉ नंदू तायडे , डॉ जीवने ,डॉ चिंचोले नेत्ररोग तज्ञ , डॉ स्वप्नील वेरुळकर , डॉ गुलाब पवार ,डॉ विकास शेळके अस्थिरोग तज्ञ ,डॉ श्रीकांत लांजुळकर, डॉ सचिन वजे, मानसिक रोग तज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जाधव डॉ वायाळ सायकॉलॉजिस्ट , या तज्ञ चमूने दिव्यांगांची तपासणी केली . तसेच डॉ गट्टानी , लांडे सहा अधीक्षक, संदिप गोंड समुपदेशक , रूपेश तायडे फार्मासिस्ट , कांजरे साहेब इत्यादिंचे विशेष सहकार्य लाभले . शिबिरासाठी मलकापूर येथील भगवान महावीर निवासी मूक बधिर विद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील व मतिमंद बाल प्रशिक्षण केंद्राचे वाघ सर व कर्मचारी तसेच राजू राऊत मनसे तालुकाध्यक्ष, नागेश भटकर शहराध्यक्ष, बाळू पाटील तालुका संघटक, गोपाल वानखेडे शहर उपाध्यक्ष,
वैभव येनकर शहर संघटक , प्रमोद येऊल ,व इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम यशस्वी केला या संपूर्ण कार्यक्रमासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन व चहा-बिस्कीट अल्प आहाराचे वितरण शहरातील प्रतिष्ठित नागरिक मांगीलालजी भंसाली यांच्यातर्फे सेवा पुरवण्यात आली होती या संपूर्ण शिबिराच्या यशस्वितेकरिता बि.जे. लोकसेवा ट्रस्ट मलकापूर चे अध्यक्ष अमरचंदजी संचेती यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या शिबिरा चा अनेक दिव्यांगांना लाभ मिळाल्याने तेथून परतताना त्यांच्या चेहर्यावर आनंद झळकत होता .
