जलंब येथील श्री पाई विद्यालयामध्ये मधमाश्यांचा हल्ला 13 विद्यार्थिनीं जखमी...


 सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी 

शाळा खोलीत बसलेल्या  शाळकरी विद्यार्थ्यांनीवर मधमाशांनी  प्रवेश करून हल्ला केल्यामुळे 13 विद्यार्थ्यांना चावा घेऊन जखमी केले आहे. सदर घटना आज दि.13 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता सुमारास जलंब येथील श्री पाई विद्यालय येथे घडली. या बाबत वृत्त असे कि जलंब येथील श्री पाई विद्यालयामध्ये  वरच्या मजल्यावर असलेल्या वग॔  खोलीमध्ये शाळेच्या बाजुलाच असलेल्या झाडावर माकडाने उडी मारल्यामुळे त्या झाडावर असलेल्या मोहातील मधमाशांनी उठून वग॔ खोलीत प्रवेश करून खोलीत असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनीवर हल्ला चढवून जखमी केले आहे या मध्ये राधा मंडवाले,क्षृती धांडे, कोमल मेहंगे,सुमिञा खुमकर,आशा मोहे,पुजा राजपूत, प्रिती गव्हांदे, आरती चिमनकर,प्राची वानखडे, सोनाली गवई, प्रतिश्रा गावंडे ,साक्षी अवचार, कोमल मानकर, वैष्णवी सावळे इत्यादी विद्यार्थीनी जखमी झाले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनी तातडीने  उपचारासाठी जलंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले...... उल्लेखनीयबाब म्हणजे मधमाश्यांच्या हल्लात जखमी झालेल्या विद्यार्थिनींना उपचारासाठी जलंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता दवाखान्यामध्ये वेळेवर एकही डाॅकटर हजर नसल्यामुळे विद्यार्थिनींना 20 ते 25 मिनिटे ताटकळत बसावे लागले असल्याने ञास सहन करावा लागला. तसेच जखमी झालेल्या बहुतांश विद्यार्थिनींना वैद्यकीय अधिकारी डाॅ.नेहा अग्रवाल यांनी हातामध्ये इंजेक्शन दिल्यामुळे त्यांच्या हातामधुन रक्त निघाल्या मुळे एका विद्यार्थिनींच्या पालकाने थेट वैद्यकीय अधिकारी यांच्या समोरच संताप व्यक्त केला.

Previous Post Next Post