शेगाव शहरात पोलिसांकडून काही घटना घडल्या की,त्यात भाजप, विहिप, व बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात असून त्यात कलम 353 ही कलम हमखास लावली जाते. पोलिसच शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असून पोलिसांकडून कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे. असा आरोप करत अशा गुन्ह्याची तपासणी वरीष्ठ अधिकारी यांनी करावी तसेच सदर कलम मागे घ्यावे अशी मागणी आ. डॉ संजय कुटे, आणि बजरंग दल प्रांत संयोजक अमोल अंधारे यांनी गुरुवारी शेगावात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या शुक्रवारी शेगाव शहरात धरणे आंदोलन तर सोमवारी जिल्हाभर तहसील कार्यलयाला निवेदने देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.शेगाव शहरात श्रीरामनवमी निमित्ताने काही दिवसांपासून खामगाव रोडवरील स्व गजाननदादा पाटील मार्केट यार्ड व हॉटेल एमटीडीसी येथे आनंद मेला सुरू आहे. यामध्ये 13 एप्रिल रोजी रात्री याठिकाणी रामाचे गाणे लाव असे समोर करून कारण मेला चालकास व त्याचे पत्नीला काही युवकांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी 8 जनांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले. दोन्ही कडील व्यक्ती तक्रार देण्यास तयार नसताना व प्रकरण आपसात सामंजस्याने मिटवण्यास तयार असतांना शहर पोलिसांनी हेतुपुरस्सर स्वतः फिर्यादी होऊन ही कारवाई हेतुपुरस्सर पणे केली व त्यात कलम 353 चुकीची लावली.याबाबत आ डॉ संजय कुटे व बजरंग दल संयोजक अमोल अंधारे यांनी 14 एप्रिल रोजी दुपारी स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या एकंदरीत कारवाईवर ताशेरे ओढले . तसेच स्व गजाननदादा पाटील मार्केट यार्ड मधील मेल्यास परवानगी होती आणि हॉटेल एम टी डी सी मधील मेळ्याची परवानगी नव्हती असे सांगत हे सर्व पोलिसांशी आर्थिक देवाण घेवाण व्यवहार झाल्याने चालत होते का ? या अन्यायकारक कारवाईचा निषेध करण्यासाठी शहरातील सर्वपक्षीयांकडून 15 एप्रिल रोजी गांधी चौकात तीन तास धरणे आंदोलन करण्यात येईल. तसेच सोमवारी तहसीलदारांना याबाबत जिल्हाभरात निवेदन देण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आ.डॉ. संजय कुटे आणि बजरंग दल प्रांत संयोजक अमोल अंधारे यांनी घेतली संयुक्त पत्रकार परिषद.पत्रकार परिषदेत पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख