मातोश्री पब्लिक स्कूल पिंपळगाव काळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य राम श्रीराम पिंजरकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा संपन्न...

मंगल काकडे. पिंपळगाव काळे प्रतिनिधी..

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे दिनांक १४ एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मातोश्री पब्लिक स्कूल पिंपळगाव काळे येथे साजरी करून सर्वप्रथम मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.महात्मा ज्योतिबा फुले. विद्येची माता सरस्वती. या तिनी प्रतिमेचे पूजन करून व हार घालून आशीर्वाद व अभिवादन करून पुढील सत्कार कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल राम पिंजरकर यांचा  मातोश्री पब्लिक स्कूल पिंपळगाव काळे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष उखर्डा सातव सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार शाळेचे मुख्याध्यापक बाळ सर यांनी केला.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख psi राम पिंजरकर यांचा सत्कार संस्थेचे सचिव महादेव सातव सर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला. व पवन खोबरखडे सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार किशोर अंबडकार सर यांनी केला.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी भाषणे दिले. तसेच अवचार मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा दिला.सदर कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक राम पिंजरकर यांनी  शाळेतील मुला-मुलींना सांगितले की मी खूप परिश्रम करून आठ वर्ष पी.एस.आय.पदापर्यंत पोचण्यासाठी लागले व ते मी यशस्वीरित्या पार केले.असे मार्गदर्शन करून मार्गदर्शनपर भाषण दिले.संस्था सचिव महादेव सातव सर यांनी विद्यार्थ्यांना शेवटी आपले मार्गदर्शनपर भाषण देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.प्रमुख उपस्थिती.महादेव सातव सर.सौ.विजयाताई सातव. ज्ञानेश्वर बोचरे सर.शाळेचे मुख्याध्यापक बाळ सर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक किशोर अंबड कार सर.यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दत्तात्रेय दाभाडे सर यांनी केले.

Previous Post Next Post