प्रतिनिधी/प्रशांत भोपळे.
हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दानापूर परिसरातील काही शेतकरी आणि गौरक्षकांनी 9 एप्रिल रोजी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान संशयितरित्या 40 गोवंश जाताना दिसले. सदर माहिती शेतकऱ्यांनी गोरक्षकांनी फोनवरून पोलीस यंत्रणेला दिल्यावर दानापूर परिसरात पोलीस दाखल केले होते परंतु पोलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने तुमच्या मदतीसाठी काही युवक गोरे हाकलत हिवरखेड च्या दिशेने निघाले. सकाळी सात वाजेच्या दरम्यान हिवरखेड येथील सोनवाडी स्टॉप जवळ सदर युवकांना गोवंश सोडण्यास सांगितले परंतु युवकांनी व पोलिसांनी गोवंशाचे पोलीस ठाण्यात नेणार असल्याचे सांगितल्यावरून वाद वाढत गेला आणि वाद विकोपाला जाऊन हाणामारी झाली. त्यामध्ये जमावाने गोरक्षकांसोबतच पोलिसांवर सुद्धा हात उगारल्याची चर्चा आहे. सुदैवाने पोलिसांना दुखापत झाली नाही. सदर हाणामारीत अनेक जण जखमी झाल्याची चर्चा असून त्यापैकी काहींना अकोला येथे रेफर केल्याचे बोलले जाते. पोलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने एका जमावाने त्याचा फायदा घेत प्रचंड दादागिरी केली आणि पोलिसांच्या ताब्यातील चाळीस गोवंश छान पैकी 36 गोवंश घेऊन पसार झाले. पोलिसांना फक्त चार गोवंश रोखण्यात यश आले. चाळीस पैकी उरलेले चार गोवंश हिवरखेड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत कोणत्याच इसमाने पोलिसांमध्ये तक्रार दिली नव्हती आणि हिवरखेड पोलिसात कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता परंतु स्वतः पोलिसांतर्फे घटनेची फिर्याद दिली जाईल अशी माहिती मिळाली. सकाळी घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ रितू खोकर व त्यांचा ताफा तेल्हारा चे ठाणेदार ज्ञानोबा फड व त्यांचा ताफा अकोला येथून आरसीबी प्लाटून हिवरखेड दाखल झाले होते परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात होती.
हिवरखेड ठरत आहे गोवंश तस्करीची राजधानी..
मागील काही वर्षात अकोला जिल्ह्यातील हिवरखेड रुपराव हे स्थळ मध्य प्रदेशातून महाराष्ट्रासह आंतरराज्यीय स्तरावर गोवंशाच्या तस्करीचे प्रमुख केंद्र बनले आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही या परिसरातून सर्रास गोवंश तस्करी चालते आणि मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल सुद्धा होते. अनेकदा कारवाया झाल्या परंतु गोवंशाची कत्तल आणि तस्करीला आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सदर गोवंशाची कत्तल आणि तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याची परिसरात चर्चा आहे. संबंधित यंत्रणेकडून अभय मिळत असल्यामुळे गोविंद तस्करांचे मनोबल संबंधित यंत्रणेकडून अभय मिळत असल्यामुळे गोवंश तस्करांचे मनोबल खूपच वाढले असल्याचे बोलले जाते. जोपर्यंत झरी गेट येथे पोलीस चौकी स्थापित होत नाही तोपर्यंत गोवंशाच्या तस्करीला आळा बसणे शक्य नाही असेही जाणकारांचे मत आहे.